अखेर सचिन तेंडुलकर बनला वरबाप, मुलगी साराच्या हातावर रंगली मेहंदी..पहा व्हिडीओ

आपल्या देशात कदाचितच कोणी असेल, ज्याला सचिन तेंडुलकर हे नाव माहीत नाही. संपूर्ण जगामध्ये क्रिकेटचा देव म्हणून सचिन तेंडुलकरला ओळखले जाते. सचिनने आपल्या तुफान खेळाने, संपूर्ण जगामध्ये लोकप्रियता कमावली. आजही कित्येक विक्रम सचिनच्या नावे आहेत.

कदाचितच एखादा खेळाडू सचिन तेंडुलकरने केलेले ते विक्रम मोडू शकेल. त्याचे क्रिकेट करियर खूपच शानदार असे होते. सचिन सोबतच त्याचे पूर्ण कुटुंब देखील चांगलेच प्रसिद्ध आहे. मागील काही दिवसांपासून त्याची मुलगी सारा तेंडुलकर कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चांगलीच चर्चेमध्ये आली आहे.

मध्यंतरी सारा आपल्या अफे’अरच्या चर्चांमुळे चांगलीच प्रकाशझोतात आली होती. मात्र याबद्दल कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही त्यामुळे या चर्चा आपोआपच बंद झाल्या. साराने मॉडलिंग क्षेत्रात तर पदार्पण केलेच आहे. मात्र लवकरच ती बॉलिवूडमध्ये देखील पदार्पण करणार असल्याचे चर्चा रंगली आहे.

मात्र त्यात आता अचानक साराचा मेहंदी लावतानाचा फोटो समोर आला आहे. इतकच काय तर सचिनने देखील डोक्याला फेटा लावून माझ्या मुलीच्या लग्नाच्या सोहळा आम्ही पार पाडत आहोत अशी पोस्ट सोशल मीडियावर केली आहे. त्यामुळे सध्या सगळीकडे एकच गोंधळ उडाला आहे.

बॉलीवूडमध्ये लवकरच सारा पदार्पण करणार या चर्चा सुरू असतानाच तिच्या लग्नाचे फोटो समोर आल्याने चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. बरं याबद्दलची माहिती स्वतः सचिन तेंडुलकरने दिल्यामुळे नक्की कोणत्या बातमीवर विश्वास ठेवावा याबद्दल चाहत्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. तर आम्ही तुम्हाला सांगतो सचिनने instagram वर एक व्हिडिओ शेअर केला आहे.

त्यामध्ये तो कुटुंबातील एका लग्नासाठी तयार होत असून डोक्यावर फेटा बांधत असल्याचा दिसत आहे. इतकच काय तर मागे बॅकग्राऊंड मध्ये एक मराठमोळ गाणं देखील सुरू आहे. त्याचं झालं असं की, सचिन तेंडुलकरचा मोठा भाऊ नितीन तेंडुलकरची मुलगी करिष्मा नुकताच विवाह बंधनात अडकली.

त्याच दरम्यानचा हा व्हिडिओ सचिनने आपल्या सोशल मीडियावर शेअर केला. यावेळी सचिन अस्सल महाराष्ट्रीयन पारंपारिक लुकमध्ये दिसला. त्याच्या या लुकला चाहत्यांनी भरभरून प्रतिसाद दिला. हा व्हिडिओ लाईक करणाऱ्यांमध्ये माजी क्रिकेटपटू युवराज सिंग सुद्धा आहे. इतकच काय तर युवराज सिंगने त्याच्या व्हिडिओवर कमेंट करत लिहिल आहे की, ‘ऑय सचिन कुमार आहे.’

चाहत्यांना त्याचा हे कमेंट भलताच आवडला आहे. त्याच्या कमेंट वर देखील चाहते लाईक्सचा वर्षाव करत आहेत. दरम्यान साराने देखील आपल्या बहिणीच्या लग्नातील फोटो सोशल मीडियावर शेअर केले. याच वेळी तिने आपल्या हातांवर मेहंदी काढली आणि पारंपारिक महाराष्ट्रीयन लुक मध्ये साराचा सौंदर्य अजूनच खुलून आलं.

नवरी अर्थात बहीण करिष्मा सोबत देखील साराने चांगलाच फोटोसेशन केलं. यावेळी संपूर्ण तेंडुलकर कुटुंब आनंदित आणि उत्साहीत असल्याचे बघायला मिळालं. परंतु अर्जुन तेंडुलकर या लग्नात कुठेच दिसला नाही. सध्या अर्जुन आपल्या करिअरवर लक्ष केंद्रित करत असून इंदोरच्या स्टेडियम मध्ये सराव करत असल्याचं त्याचे इंस्टाग्राम स्टोरीज वरून समोर आलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

https://marathimaaj.in/wp-admin/options-general.php?page=ad-inserter.php#tab-12