अखेर मलायका सोबतच्या नात्यावर अरबाज खानने सोडले मौन, दुसऱ्या लग्नाबाबत म्हणाला, ‘ही’ होणार सलमानची भाभी?

बॉलीवूड मध्ये कधी अचानक कोण्या सेलिब्रिटीज मध्ये नवीन नाते बनल्याची बातमी येते तर, कधी अचानकच ते नाते तुटल्याच्या देखील बातम्या येतात. कधीच काही शाश्वत नसते हे बॉलीवूडकर नेहमीच आपल्याला सांगून जातात आणि कदाचित म्हणूनच बॉलीवूडला मायानगरी म्हणून संबोधले जाते. कधी जुळलेले नाते वर्षानुवर्षे टिकत, तर कधी काही महिन्यातच संपते.
अशी अनेक नाते आपण बॉलीवूडमध्ये पहिले आहेत जे खूपच अचानकच सर्वांच्या समोर आले. त्यांच्या मधील प्रेम बघून ते कधीच तुटणार नाही असा विश्वास त्यांच्या चाहत्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना, मित्रांना होता मात्र तरीही ते नाते तुटले आणि सर्वांनाच धक्का बसला. आपल्या पहिल्याच सिनेमामधून, देशातील लाखो मुलींच्या मनात जागा निर्माण केलेल्या ह्रितिकने आपल्या करियरच्या सुरुवातीलाच सुजैनसोबत लग्न केलं.
त्यांचे नाते अनेक वर्षांचे होते आणि एकमेकांच्या प्रेमात वेड्या झालेली या दोघांनी लग्न केलं आणि त्यांचं प्रेम देखील तसेच खुलत चालल होत. मात्र लग्नाच्या १२-१३ वर्षांनंतर ते दोघे वेगळे झाले, आणि यावर कोणाचाच विश्वास बसत नव्हता. असच काही झालं होत अरबाज खान आणि मलाईकाच्या नात्याबद्दल. खान खानदानाची सून, सलमान खानची भाभी आणि प्रसिद्ध मॉडेल म्हणून मलाईकाला अनेक ओळख होत्या.
अरबाज आणि तिच्या प्रेमाच्या चर्चा चांगल्याच रंगत होत्या. नेहमीच एक आयडल आणि परफेक्ट कपल म्हणून त्या दोघांकडे बघितले जात होते. त्यांच्या मध्ये वाद असल्याच्या बातम्या येत असे, मात्र इतर नवरा-बायको असे छोटे मोठे भांडण आहे, असच ते दोघेही सांगत असे. मात्र अचानकच मलाईका आणि अअरबाज खान वेगळे झाले असलायची बातमी आली.
सुरुवातीला या बातमीने चांगलीच चर्चा रंगवली मात्र, कोणालाच या बातमीवर विश्वास नव्हता. मात्र त्या दोघांचा घ’टस्फो’ट झाला आणि त्यांच्या चाहत्यांची मन दुखली. अनेक वेळा मलाईकाने आपल्या नात्याबद्दल मुलाखतीमध्ये काही ना काही सांगितले होते. घ’टस्फो’ट घेण्याचं कारण देखील तिने काही वेळा सांगितले होते.
मात्र, अरबाज खानने कधीही याबद्दल कोणतेच वक्तव्य दिले नाही. जे झालं ते झालं, आणि त्याबद्दल त्याने काहीही बोलणे नेहमीच टाळले. त्यामुळे अनेक वेळा त्याच्या मुळेच हे नाते संपले आहे असाच सर्वांचा समज होता. आता मात्र अरबाजने आपले मौन सोडले असून पाहल्यांदाच आपल्या आणि मलाईकच्या नात्याबद्दल वक्तव्य दिल आहे.
पिंच या अरबाज खानच्या टॉकशोची सध्या चर्चा सुरु आहे. युट्युबवर त्याचा हा शो येणार आहे. याच शोमध्ये त्याने आपल्या नात्याबद्दल बोलले आहे, ‘आम्ही वेगळे झालो असले तरीही, आजही आमचा मुलगा तर एकच आहे. पालक म्हणून आम्हाला त्याचा, त्याच्या वयाचा, मनाचा विचार करावाच लागतो.
आमच्या मुलाने आपली वेगळी ओळख निर्माण करावी, आपले अस्तित्व निर्माण करावे अशी आमच्या दोघांचीही मनापासून इच्छा आहे. राहिला प्रश्न माझ्या लग्नाचा.. तर असा काही नियम नाहीये ना की, पुन्हा लग्न होऊ शकत नाही. जशी परिस्थिती असले, तसेच काही घडेल,’ असं अरबाज खान बोलला आहे. सध्या अरबाज खान इटालियन मॉडेल जॉर्जियाला डेट करत असल्याचं सांगितलं जात आहे.
मात्र, त्याच्या या वक्तव्यामुळं आता अरबाज आणि तिचं लग्न होणार आहे का, अशी चर्चा सगळीकडे सुरु झाली आहे. दरम्यान त्याच्या या टॉकशोचा पहिला पाहुन अजून कोणी नसून, त्याचा भाऊ बॉलीवूडचा दबंग खान म्हणजेच सलमान असणार आहे. त्यामुळे आता या शोची चांगलीच चर्चा रंगली आहे.