अखेर ठरलं ! ‘या’ बड्या राजनेत्याची मुलगी होणार ठाकरे कुटुंबाची सून !

अखेर ठरलं ! ‘या’ बड्या राजनेत्याची मुलगी होणार ठाकरे कुटुंबाची सून !

सध्या सगळीकडेच लगीनघाई बघायला मिळत आहे. एकापाठोपाठ एक राजेशाही विवाह सोहळे पार पडत आहेत. सेलिब्रिटीज आणि अनेक बड्या नेत्याच्या कुटुंबात सनईचे सूर ऐकायला मिळत आहेत. नुकतंच, महाराष्ट्रातील तोफ समजल्या जाणाऱ्या आणि दिल्लीला देखील आपल्या खास शैलीने गप्प करणाऱ्या संजय राऊत यांच्या मुलीचा विवाह सोहळा पार पडला.

या लग्नाच्या चांगल्याच चर्चा रंगल्या होत्या. संजय राऊत यांच्या मुलीचा विवाह सोहळा एखाद्या राजेशाही कुटुंबाच्या लग्न सोहळ्याप्रमाणेच पार पडला. यामध्ये आपल्या सडेतोड बोलण्याने, भल्याभल्याना गप्प करणाऱ्या संजय राऊत यांच बाप-पण बघायला मिळालं. इतर सर्व सामान्य बापाप्रमाणे संजय राऊत देखील आपल्या लेकीच्या लग्नात चांगलेच भावुक झाल्याचे पाहायला मिळाले.

तर दुसरीकडे जितेंद्र आव्हाड यांनी देखील आपल्या एकुलत्या एक कन्येचा विवाह सोहळा पार पाडला. जितेंद्र आव्हाड यांनी अगदी साधारण पद्धतीने आपल्या मुलीचे लग्न लावले. तरीही मुलीच्या लग्नाच्या वेळी, अनेक दिग्गजांना आपल्या खड्या बोलणे रडायला लावणारे जितेंद्र आव्हाड स्वतः मात्र चांगलेच भावुक झाले. त्यांना मुलीच्या लग्नात अश्रू अनावर झाले.

आता सध्या संपूर्ण देशामध्ये कॅटरिना आणि विकी कौशलच्या लग्नाच्या बातम्या सुरु आहेत. आज म्हणजेच ७ डिसेंबर पासून त्यांच्या लग्नाच्या विधींना सुरवात झाली असून ९ डिसेंबर रोजी दोघं सप्तपदी घेणार आहेत. मात्र आता महाराष्ट्रात अजून एका शाही लग्नाची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. नुकतंच इंदापूरचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील आपल्या मुलीसोबत म्हणजेच अंकिता पाटील सोबत राज ठाकरे यांच्या भेटीला गेले होते.

अचानकच हर्षवर्धन पाटील आपल्या मुलीसोबत राज ठाकरेंच्या भेटीला गेले म्हणून राजकीय चर्चेला उधाण आले होते. पण हि भेट राजकीय नाही तर खाजगी होती. या भेटीने एक आनंदाची बातमी दिली. हर्षवर्धन पाटील यांची कन्या आणि पुणे जिल्हा परिषद सदस्य अंकिता पाटील लवकरच ठाकरे कुटुंबाची सून होणार आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे दिवंगत भाऊ माधव ठाकरे यांचे सुपुत्र आणि नामवंत वकील निहार ठाकरे आणि अंकिता पाटील २८ डिसेंबर रोजी लग्नबेडीत अडकणार आहेत. याच लग्नाचं निमंत्रण देण्यासाठी हर्षवर्धन आणि अंकिता पाटील राज ठाकरे यांच्याकडे गेले होते. अंकिता पाटील अत्यंत सुंदर राजकारणी आहेत. त्यांना सून बनवून घेण्याची इच्छा अनेक बड्या कुटुंबाला होती.

पण यामध्ये अखेरीस अंकिता आता ठाकरे कुटुंबाची सून होणार आहे. माघील अनेक दिवसांपासून अंकिता पाटील लवकरच विवाह बंधनात अडकणार असल्याची चर्चा सुरु होती. शिवाय काही दिवसांपासून अंकिता, ठाकरे कुटुंबाची सून होणार अशा चर्चा देखील राजकीय वर्तुळात सुरु होत्या. २८ डिसेंबर रोजी मुंबईमध्ये अंकिता आणि निहार दोघांचा विवाह सोहळा पार पडणार आहे.

या सोहळ्याला आमंत्रण देण्यासाठी आज हर्षवर्धन पाटील आणि अंकिता दोघांनी अनेकांच्या खास भेट घेतल्या. हे लग्न मुंबईमध्ये नक्की कोठे पार पडणार आहे, याबद्दलचा कोणताही खुलासा अद्याप झालेला नाहीये. पण या लग्नात राज ठाकरे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पुन्हा एकदा एकत्र पाहायला मिळणार हे नक्की. या विवाहाचे राजकीय वर्तुळात काय पडसाद उमटणार, याकडे आता सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *