अंकुश चौधरीच्या पत्नीने शेअर केला त्यांच्या खाजगी आयुष्यातील ‘तो’ किस्सा, म्हणाली: ‘अंकुश चौधरी नाही तर या व्यक्तीसोबत मला…’

अंकुश चौधरीच्या पत्नीने शेअर केला त्यांच्या खाजगी आयुष्यातील ‘तो’ किस्सा, म्हणाली: ‘अंकुश चौधरी नाही तर या व्यक्तीसोबत मला…’

बॉलीवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत, जे आपल्या फिटनेसमुळे आजही चाहत्यांमध्ये लोकप्रिय आहेत. या अभिनेत्याच्या फिटनेसमुळे त्यांच्या वयाचा अंदाज लावणं चांगलाच कठीण होते. त्या तुलनेत मराठी सिनेसृष्टीमधे खूप कमी असे कलाकार असतात, जे आपल्या फिटनेसमुळे ओळखले जातात.

अशा काही मोजक्या अभिनेत्यापैकी एक अभिनेता अंकुश चौधरी देखील आहे. सुरुवातीपासूनच अभिनेता अंकुश चौधरी त्याचा, लूकमुळे चर्चेत राहीला आहे. भारदस्त उंची, फिटनेस आणि त्याला साजेशी स्टाईल यामुळे अंकुश चौधरी मराठी सिनेसृष्टीमधील एक अतिशय देखणा अभिनेता आहे. तस त्याची पत्नी देखील चांगलीच देखणी आहे.

हिंदी मालिकाविश्वामधे मीत, रेथ, थोडी ख़ुशी थोडा गम आणि शौर्य अनोखी कि कहाणी सारख्या मालिकांमध्ये आपल्या अभिनयाची छाप सोडणारी दीपा परब त्याची पत्नी आहे. अभिनेत्री दीपा परबने मधल्या काळात अनेक हिंदी मालिकांमध्ये काम केले आहे. मात्र लग्न झाल्यानंतर ती संसारातच रमली.

आता, झी मराठी वाहिनीवरील ‘तू चाल पुढं’ या मालिकेच्या निमित्ताने तिने बऱ्याच वर्षांनंतर छोट्या पडद्यावर कमबॅक केलं. या मालिकेमधील ती साकारत असलेली गृहिणीची भूमिका सध्या चर्चेत आहे. हिंदी आणि मराठी मालिकाविश्वामधे आपल्या उत्तम अभिनयाने स्वतःची जागा निर्माण करणाऱ्या दीपाने, ‘तू चाल पुढं’मधील भूमिकेने पुन्हा एकदा प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.

दीपा सोशल मीडियावरही चांगलीच सक्रिय असते. इतर सेलिब्रिटींप्रमाणेच दीपाबाबतही अनेक गोष्टी जाणून घेण्यात तिचे चाहते उत्सुक असतात. खास करून तिच्या आणि अंकुशच्या लव्हस्टोरी बद्दल फार काही माहिती नाही. त्यामुळे त्याबद्दल जाणून घेण्यासाठी अनेकजण आतुर असतात. आणि आता दीपाने स्वतःच तिच्या खासगी आयुष्याबाबत काही खुलासे केले आहेत.

लोकमत फिल्मशी बोलताना तिने भाजी घेण्यापासून ते आपल्या क्रश पर्यंत सर्वच गोष्टींचा अगदी बिनधास्तपणे खुलासा केला आहे. दीपाला विचारले होते की, ‘तू भाजी आणायला जातेस का? आणि भाजी घेताना बार्गेनिंग करतेस का?’ त्यावर तिने उत्तर दिले, ‘हो मला आवडतं भाजी आणायला. आता शूटिंगमध्ये व्यस्त झाल्यापासून मी जात नाही.

पण जेव्हा मी भाजी घ्यायला जाते मी, बार्गेनिंग नक्कीच करते.’ तिला पुढे प्रश्न विचारला की, ‘तू कोणाला प्रपोज केले आहे का?’ यावर दीपा म्हणाली, ‘नाही. पण मला एका मुलाला खरच प्रपोज करायचे होते. सचिन तेंडुलकर माझा क्रश होता त्याला मला प्रपोज करायचे होते. माझ्या नवऱ्याने एक कार्यक्रम केला होता.

तेव्हा सचिन आला होता. त्यावेळी मी त्याच्या बाजूला बसले होते. आणि ते क्षण माझ्यासाठी खूप खास आहेत.’ दरम्यान, दीपा आणि अंकुशला एक लहान मुलगा आहे. त्यांच्या मुलाला जोपर्यंत आईची खूप जास्त गरज होती, तोपर्यन्त दीपा अभिनयापासून दूरच राहिली. मात्र, आता तिने पुन्हा एकदा आपल्या करियरला सुरुवात केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

https://marathimaaj.in/wp-admin/options-general.php?page=ad-inserter.php#tab-12